भारतातील एक गाव जिथे लोक अनवाणीच फिरतात

0
4

भारतीय घरांमध्ये बहुतांश लोक विना चप्पल घराच्या आतमध्ये वावरतात. लोक चप्पल बूट घराबाहेर काढतात. बाहेर रस्त्यावर फिरताना कुठेही तुम्हाला क्वचितच कुणी विना चप्पल बुटांचे दिसतील. मात्र दक्षिण भारतात एक असे गाव आहे ज्याठिकाणचे लोक कधीच चप्पल बूट घालत नाहीत. या गावातील लोक कधीही घराबाहेर पडताना चप्पल घालत नाहीत.गावात चप्पल बूटांवर बंदी आहे का असा प्रश्न विचारला जातो परंतु या गावातील या प्रथेमागे रंजक कहाणी आहे. माहितीनुसार, या छोट्या गावाचे नाव अंडमान आहे जे तामिळनाडूची राजधानी चेन्नईपासून ४५० किमी अंतरावर आहे. या गावात १३० कुटुंब राहतात.

 

याठिकाणी बहुतांश लोक शेतकरी आणि शेतात मजुरी करणारे आहेत. गावातील केवळ वृद्ध अथवा आजारी व्यक्तीच चप्पल बूट परिधान करू शकतो बाकी इतर कुणीही गावात चप्पल बुटात फिरत नाही. बऱ्याचदा अति उष्णतेमुळे गावातील काही जमिनीवरील चटक्यापासून वाचण्यासाठी चप्पल घालतात. गावातील शाळकरी मुलेही बूट चप्पल न घालताच शाळेत जातात. इतकेच नाही तर जसे बॅग हाती घेतली असावी तसे काही जण हातात चप्पल बूट घेऊन चालताना दिसतात. गावात अशी कथा सांगितली जाते की, या गावाचे संरक्षण मुथ्यालम्मा नावाची एक देवी करते जिच्या सन्मानासाठी येथील लोक चप्पल बूट घालत नाहीत. ज्याप्रकारे लोक मंदिरात चप्पल बूट घालून प्रवेश करत नाही तसे इथली लोक हे गाव मंदिरच असल्याचे मानतात.

 

या गावात विना चप्पल बूट चालण्याची प्रथा अनेक वर्षापासून सुरू आहे. कुणीही इथे जबरदस्ती केली नाही. इथले लोक केवळ एका प्रथा परंपरेचे पालन करतात. जर ही प्रथा मान्य असेल तर चांगले, परंतु जर कुणाला मान्य नसेल तर अशांवर कुठलीही जबरदस्ती केली जात नाही. परंतु खूप वर्षापूर्वी लोकांमध्ये असे बोलले जायचे की, जर या नियमांचे पालन केले नाही तर गावात एक रहस्यमय आजार पसरेल आणि त्यातून सर्वांचा मृत्यू होईल. मार्च एप्रिलमध्ये गावकरी देवीची पूजा करतात.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here