बहिणीसमक्ष अल्पवयीन मुलीवर बलात्कार; हत्या

0
13

राज्यातील महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. जळगावच्या चोपडा येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शेतामध्ये एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून नंतर तिच्या डोक्यात दगड घालून निघुण हत्या करण्यात आली. तिच्या लहान बहिणीने हा प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत एका संशयित नराधमाला अटक करण्यात आली. चोपडा शहरापासून १५ ते २० किलोमीटर असलेल्या गावात शेतातील निंदणीचे काम आटोपून दोन बहिणी घरी निघाल्या होत्या.

 

याच दरम्यान मोठ्या बारावर्षीय मुलीला आरोपीने शेतामध्ये ओढत नेऊन तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. त्यानंतर घटना उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिला दगडाने ठेचून ठार मारले.गावात संतापाची लाट ही घटना उघडकीस येताच गावात संतापाची लाट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मारेकऱ्याचा तपास सुरू केला. चोपडा-आडगाव रस्त्यावर तो पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला. जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

कल्याणमध्ये विवाहितेवर सामूहिक अत्याचार !तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका तीस वर्षीय विवाहित महिलेवर घरात घुसून नातेवाईकांनीच सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या लहान मुलांसमोरच आरोपींनी कृत्य केल्याने संताप व्यक्त होत आहे. तीस वर्षीय विवाहित महिला टिटवाळा नजीक आपले पती व दोन मुलांसह वीटभट्टीवर काम करत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करते. पीडितेचा पती बाजार करण्यासाठी बाहेर गेला होता. रात्री दहापर्यंत तो आला नसल्याचा फायदा उठवत पीडितेचा सासरा, दीर आणि एका अल्पवयीन नातेवाईकाने झोपडीत घुसत तिच्यावर सामूहिक पाशवी अत्याचार केला. तिच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. पती घरी आल्यावर घडलेला प्रकार तिने पतीला सांगितला. पण, पतीनेही तिला बेदम मारहाण करत घडलेल्या प्रकाराची वाच्यता करू नकोस, असा दम दिला.
तिन्ही आरोपी ताब्यात
पीडित महिलेला गंभीर अवस्थेत ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचारार्थ शुक्रवारी दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटना शुक्रवारी घडली असताना कल्याण तालुका पोलीस स्टेशनमध्ये रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला असल्याची माहिती यावेळी पोलिसांकडून देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी तपासाला गती देत तिन्ही आरोपींना अटक केली
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here