आटपाडी : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने गाडीतून नेहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आटपाडी पोलिसात अत्याचार करणारा संशयित व त्याला मदत करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी,संशयितांनी पिडितेला जबरदस्तीने चारचाकी गाडीत घालून आटपाडी तलाव परिसरात नेहले.तेथे चारचाकी गाडीत जबरदस्तीने पिडितेवर अत्याचार केला.शिवाय पिडीतेचे आपेक्षार्य फोटो व व्हिडिओ काढत उद्या परत माझ्यासोबत यायचे नाही तर हे फोटो सर्वांना दाखवीन अशी धमकी दिली.
त्याचबरोबर यांची कुठेही वाच्चता केल्यास घरच्यांना व बहिणीला मारून टाकेन अशीही धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीसांनी कारवाई सुरू केली आहे.