नराधम बापाकडून पोटच्या दोन मुलींवर अत्याचार !
शनिवारी एका ५२ वर्षीय व्यक्तीला पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली. याप्रकरणी त्याच्या १८ वर्षीय मुलीने तक्रार केली आहे.तक्रारदार मुलगी ही तिचे वडील, आई आणि छोट्या बहिणीसह गिरगावमध्ये राहत होती. काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिला अनाथालयात पाठविण्यात आले. तिला स्वतःच्या घरात सुरक्षित वाटत नव्हते. याप्रकरणी बालकल्याण समिती (सीडब्लूसी) कडेही तक्रार करण्यात आली होती.
दरम्यान मार्चमध्ये तिची आई अनाथालयात तिला भेटायला गेली, तेव्हा नराधम बाप १३ वर्षीय छोट्या मुलीला नायगावच्या चाळीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे मुलींने आईला सांगितले.धक्का बसलेल्या आईने ते अनाथालयातील महिला कर्मचारी आणि सीडब्लूसीला सांगितल्यानंतर या पिडीत मुलीचे समुपदेशन झाले आणि अत्याचाराचा हा प्रकार उघड झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २०११ मध्ये ५ वर्षांची असल्यापासून तिचे वडील तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. वडिलांशी वाद झाल्यानंतर आईच्या अनुपस्थितीत तो अत्याचार करायचा, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याने या मुलीने कोणालाच काही सांगितले नाही. २०१६ पर्यंत ती या मानसिक यातना सहन करत राहिली.
अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाचा अत्याचार
अंबरनाथमध्ये १५ वर्षीय मुलीवर रिक्षाचालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अंबरनाथमध्ये राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी अंबरनाथ पश्चिम भागातून घरी जात असताना या रिक्षाचालकाने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवले आणि त्यानंतर तिला मोरीवली डम्पिंग ग्राउंडवर नेत तिच्यावर अत्याचार केला.
पीडित मुलीने कुटुंबीयांना सगळा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी पोलिसांनी अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत रिक्षाचालकाला अटक केली. आरोपी रिक्षाचालक हा अंबरनाथ तालुक्यातील नेवाळे परिसरातील रहिवासी आहे.