ऐकावे ते नवलचं.. स्वतःला ब्रह्मांडाचा स्वामी, ‘देवाचा पुत्र’ मानायचा; गेला तुरुंगात
स्वतःला ब्रह्मांडाचा स्वामी आणि मी देवाचा पुत्र आहे, असा दावा करणाऱ्या ७४ वर्षीय पादरी अपोलो क्विबोलॉय याला फिलीपिन्समध्ये बाल लैंगिक शोषण, मानवी तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. शोधासाठी दोन आठवड्यांपासून २ हजार पोलिसांनी शस्त्रांसह दावाओतील ७४ एकरांवर पसरलेल्या किंगडम ऑफ जिझस क्राइस्ट चर्चच्या मुख्यालयाला वेढा घातला होता.