गुन्हेगारीत मोठ्याप्रमाणावर वाढ होत आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सरकारतर्फे कडक पावले उचलण्यात येत आहे. देशात ऑनलाइन तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या गुन्ह्यांवर वचक बसवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठा निर्णय घेतला आहे. देशात ऑनलाइन पद्धतीने गुन्हे करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ५,००० सायबर कमांडो तयार केले जाणार आहेत.
आय४सी इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरच्या स्थापना दिनानिमित्त अमित शाह यांनी ही माहिती दिली. अमित शाह म्हणाले की, देशाच्या सुरक्षेसाठी सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे. सायबर सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग आहे. सायबर गुन्ह्यांना कोणतीही सीमा नसते, त्यामुळे सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना एकत्र येऊन या आव्हानाचा सामना करावा लागेल. सायबर सुरक्षेशिवाय देशाची प्रगती शक्य नाही. येत्या पाच वर्षांत ५,००० सायबर कमांडो तयार करण्याचा सरकारचा विचार आहे.
अमित शाह यांनी आय४सी अंतर्गत चार नवीन प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले आहे. देशातील सायबर गुन्ह्यांचा सामना करणे हे या प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट आहे. आय४सीची स्थापना २०१८ मध्ये गृह मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली. ही संस्था राष्ट्रीय स्तरावर सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी समन्वय केंद्राप्रमाणे काम करते. आय४सी चे मुख्य कार्य म्हणजे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीची क्षमता वाढवणे. यासह, आय४सी सायबर गुन्ह्यांशी संबंधित सर्व प्रकरणे सोडविण्यास मदत करते. तसेच देशातील सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी काम करत आहे.
आपण सायबर सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे कारण सायबर सुरक्षेशिवाय देशाची प्रगती शक्य नाही असे सांगत सायबरस्पेस सुरक्षित करण्याच्या महत्त्वावर भर देताना अमित शाह म्हणाले की, जगातील ४६ टक्के डिजिटल व्यवहार भारतात होत आहेत. देशातील सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी १४ सी अंतर्गत चार प्लॅटफॉर्मचे उद्घाटनही शाह यांनी केले. १४ सीची स्थापना २०१८ मध्ये गृह मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली आहे. देशातील सायबर गुन्ह्यांशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील समन्वय केंद्र स्थापन करणे, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींच्या क्षमता वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.