आता लागणार आईचे नाव सातबारा उताऱ्यावर | १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

0
15
सरकारी कागदपत्रांवर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतल्यानंतर येत्या १ नोव्हेंबरपासून सातबारा उताऱ्यावरही आईचे नाव लावण्यात येणार आहे.

 

१ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्यांच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास संबंधितांच्या आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, वडिलांचे नाव बंधनकारक नसेल. तसेच यानंतर करण्यात येणाऱ्या फेरफारमध्येही आईचे नाव लावण्यात येणार आहे. विवाहितांना पतीचे किंवा वडिलांचे नाव लावण्याची मुभा देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने सरकारला पाठविला आहे.

 

 

दरम्यान नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ म्हणून ५० हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी मोहीम राबविली जात आहे. मात्र, त्यापूर्वीच ८ हजार २७९ मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देता येत नव्हता. आता या मृत शेतकऱ्यांच्या वारसांनाही बँकांकडे वारसा नोंद केल्यास लाभ मिळेल
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here