लग्नासाठीच्या मुलीच्या या अटी पाहून तुम्हाला येईल चक्कर

0
1

एक काळ असा होता की वधू-वर एकमेकांना न पाहताच लग्न करण्यास परवानगी देत आणि नंतर आनंदाने आयुष्य जगत असत. मात्र, सध्या एका घटस्फोटित महिलेचा बायोडेटा व्हायरल होत असून, त्यामुळे तुम्हाला धक्का बसू शकतो.

 

बायोडेटानुसार, लग्नासाठी अविवाहित मुलगा शोधणारी महिला ३९ वर्षांची असून ती शिक्षिका आहे. तिचा पगार वर्षाला १.३ लाख रुपये आहे. मात्र, तिला वर्षाला ३० लाख पगार असणारा नवरा हवा आहे. जर तो परदेशात असेल तर त्याचा पगार ८० लाख असावा. याशिवाय मुलाकडे तिच्या आई-वडिलांसोबत राहण्यासाठी ३बीएचके घर असावे.

 

 

या महिलेला पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायला आवडते. तिला घरात स्वयंपाकी आणि मोलकरीण हवी आहे. याशिवाय पतीने स्वतःच्या आई-वडिलांना सोबत ठेवू नये, असेही तिने यात म्हटले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here