मृत्यूची भीती तरी ऐन तारुण्यात आत्महत्या का वाढल्या

0
17

अपयश, नैराश्य,अपेक्षाभंग आणि नकारात्मक मानसिकतेमुळे आयुष्यापासून पळ काढणाऱ्यांची संख्या वाढत आहे. किरकोळ कारणातून थेट तणनाशक प्राशन करणे आणि गळफास घेण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः आयुष्याला आव्हान देऊन जिद्दीने उभे राहण्याची क्षमता असलेली तरुणाईच क्षुल्लक कारणातून आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात ३५० जणांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले.

महिला कणखर नोकरी आणि कुटुंब सांभाळणे, लग्नानंतर होणारा अपेक्षाभंग, व्यसनी पती आणि मुलांना सांभाळून घेणे अशा अनेक आघाड्यावर महिलांना कसरत करावी लागते. तरीही महिला शक्यतो हार मानत नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण कमी आहे
लहान वयात आत्महत्या..?
आत्महत्या करणाऱ्यात २० ते ४० वयोगटातील व्यक्तींची संख्या जास्त आहे. शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांमध्ये व्यवस्थेबद्दल उदासीनता वाढते. परिस्थितीला सामोरे जाण्याऐवजी ते मानसिकदृष्ट्या हार स्वीकारून आत्महत्या करतात.
आत्महत्येची प्रमुख कारणे काय?
प्रेमभंग : प्रेमात अपयश आले. ऐनवेळी लग्नाला किवा प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. नातेवाइकांनी प्रेम विवाहास विरोध केल्याच्या कारणातून तरुणांच्या आत्महत्या होतात. विशेष म्हणजे यात तारुण्याच्या उंबरठ्यावरील अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
नैराश्य : सतत येणारे अपयश,आर्थिक कोंडी, बेकारी, नातेवाइकांकडून असलेल्या अपेक्षा आणि समाज काय म्हणेल, या चितेतून नैराश्य वाढते. नैराश्याचे योग्य व्यवस्थापन करता न आल्याने अनेकांच्या आत्महत्या होतात.अपेक्षाभंग : २० ते ४० वयोगटातील बहुतांश व्यक्तींच्या आत्महत्या अपेक्षाभंगातून होतात. शिक्षण घेऊनही मनासारखी नोकरी मिळाली नाही. मिळालेली नोकरी सुटली. अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही. शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याच्या कारणातून आत्महत्या होतात.
नकारात्मक मानसिकता आणि वाढत्या अपेक्षा यामुळे आत्महत्येचे विचार बळावतात. कुटुंबीयांशी सुसंवाद आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने आत्महत्यांचे प्रमाण कमी होऊ शकते.
– कालिदास पाटील, मानसोपचार तज्ज्ञ
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here