छत्तीसगडमधील बालोदाबाजारमध्ये जादूटोण्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील चार जणांचा हातोड्याने शिरच्छेद करण्यात आला. मृतांमध्ये दोन बहिणी, एक भाऊ आणि एका वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. गुरुवारी रात्री सर्वांचे मृतदेह एका घरात आढळून आले. पोलिसांनी गावातील अन्य एका कुटुंबातील ५ जणांना अटक केली आहे. प्रकरण कासडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छरछेड गावात एका घरात ४ जणांचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळून आले. चेतराम, जमुनाबाई केवट, यशोदाबाई केवट आणि एका वर्षाच्या मुलाची अशी मृतांची नावे आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी आणखी दोन आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रामनाथ पटले, त्यांची पत्नी ललिता,मुळे दीपक पटले, दिल पटले आणि २२ वर्षीय मुलगी संजीता यांचा समावेश आहे.जादूटोण्याच्या संशयावरून खून झाल्याची भीती : आरोपी कुटुंबातील एका मुलाला भूतबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे, यासाठी चैतारामच्या कुटुंबाला जबाबदार धरले जात होते. आरोपींना कुटुंबातील सर्व सदस्यांना ठार मारायचे होते, मात्र दोन व्यक्ती घरात नसल्याने त्यांचे प्राण वाचले.