बलात्काराचा प्रयत्न; डॉक्टरचे प्रायव्हेट पार्ट कापला | बिहारच्या समस्तीपूरमधील प्रकार | डॉक्टरसह तीन साथिदारांना अटक

0
29

बेगुसराय ; समस्तीपूर येथे धक्कादायक घटना घडली आहे. दोन मित्राच्या साथीने बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरचे लिंग नर्सने कापले. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. संजय कुमार संजूसह तिन्ही आरोपींवर बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. बेगुसराय जिल्ह्यातील डॉ. संजय कुमार संजू, वैशाली जिल्ह्यातील सुनील कुमार गुप्ता आणि मांगरा भागातील अवधेश कुमार या तिघांनी मद्य प्राशन केले आणि मद्यधुंद अवस्थेत आरोग्य केंद्रात शिरले. त्यावेळी या तिघांनी आरोग्य केंद्र बंद केले आणि केंद्रातील सीसीटीव्ही बंद केले.नंतर तेथे काम करणाऱ्या महिलेशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.

डॉ.संजूने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या नर्सने सर्जिकल ब्लेडने त्याचे लिंग कापले. नंतर ती हॉस्पीटलमधून पळून शेतात जवून लपून बसली. तिथून तिने पोलिसांना बोलावले. पोलीस अधिक्षक विनय तिवारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने डॉक्टर आणि त्याच्या साथीदारांना हॉस्पिटलमधून अटक केली.रुग्णालयातील सीसीटीव्ही बंद जखमी डॉक्टरवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांना ती नर्स सापडली तेव्हा ती एका शेतात लपून बसली होती. ही नर्स गेल्या १०-१५ महिन्यांपासून रुग्णालयात काम करत होती. तिने पोलिसांना सांगितले की, तिने स्वसंरक्षणार्थ डॉक्टरांवर सर्जिकल ब्लेडचा वापर केला. पोलिसांना रुग्णालयातून रक्ताने माखलेल्या बेडशीट, मोबाईल फोन आणि दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here