लाडकी बहीण योजनेत 12 पुरुष झाले लाभार्थी | महिलांचे फोटो चिकटवून हेराफेरी, गुन्हा दाखल

0
29
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार उघडकीस येत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 12 पुरुषांनी अर्जावर महिलांचे फोटो चिकटवून आणि बनावट नावावर स्वतःचे आधार कार्ड वापरून योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या कन्नड तालुक्यातील या 12 पुरुषांवर शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे.

दरम्यान, कॅबिनेट मंत्री शंभुराज देसाई यांनी या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. पीडित, शोषित आणि गरजू महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सरकारने सुरू केली. तब्बल 1.59 कोटी महिलांसाठी जाहीर केलेल्या योजनेसाठी राज्यभरातून महिलांनी अर्ज केलेत.पडताळणीत बिंग फुटले योजनेच्या अर्जावर महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरला. पडताळणी करताना हा प्रकार उघडकीस आला. तपासणीत 12 अर्ज हे महिलांचे नसून पुरुषांचे असल्याचे आढळले.

त्यामुळे ते अर्ज बाद केले गेले. पुरुषांनी अर्जावर महिलेचा फोटो लावला होता. मात्र, आधार कार्डवर त्यांची नावे तशीच होती. त्यामुळे ही घटना उघडकीस आली.पत्नीच्या नावे 30 अर्ज सातारा येथे एका व्यक्तीने पत्नीच्या नावावर 30 अर्ज भरल्याचे प्रकरण ताजे असतानाच संभाजीनगर येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here