
रेणापूर येथील एका हॉटेलवर त्याने गाडी थांबविली. त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीने त्या हॉटेलच्या एका रूममध्ये घेवून गेला. त्याने रूमचा दरवाजा आतून बंद केला. त्याने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या सोबत बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. त्या लैंगिक अत्याचाराचे त्याने मोबाईलमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्यानंतर त्याने; तिने जर हा प्रकार कुणाला सांगितला तर ते सर्व फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने एके दिवशी ते सर्व व्हिडिओ आणि फोटो हे तिच्या आई वडिलांच्या मोबाईलवर पाठवून दिले.
इन्स्टाग्रामवरची मैत्री महागात पडली
पीडित तरुणीने आणि तरूण यांची इन्स्टाग्रामवरची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारली. त्या नंतर त्यांची इन्स्टाग्रामवरची ओळख झाली त्यातून ते एकमेकांशी बोलत होते. त्याचा गैरफायदा घेत तो एके दिवशी तिच्या हॉस्टेलवर गेला आणि त्याने फोन करून बाहेर बोलावून घेतले व ते दोघे मोटार सायकलवर शहरात फिरले.
तक्रारी दाखल करण्याचे आवाहन
जर असे छेडछाड किंवा अत्याचाराचे प्रकार होत असतील तर निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा तसेच कुणाला अशा प्रकाराची माहिती मिळाल्या नंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणारांचे नाव गुप्त ठेवून कठोर कारवाई केली जाईल.
– प्रशांत महाजन, पोलीस निरीक्षक, केज पोलीस ठाणे.
गुप्तपणे ठेवली पाळत
त्यानंतर त्यांनी दि. ११ सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना या सर्व प्रकारची कल्पना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी पोलीस निरीक्षक यांचे लेखनिक पोलीस नाईक संतोष गित्ते यांच्या मदतीने पीडित तरुणीची तक्रार नोंदवून घेतली. तरुणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या तरूणाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात बलात्कार, अँट्रॉसिटी आणि आय टी अँक्ट नुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा प्रकार गंभीर असल्याने आरोपी फरार होवू नये याची दक्षता घेत केज पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे सूरज गुंड याच्यावर पाळत ठेवून गुन्हा दाखल होताच त्याच्या मुसक्या आवळल्या.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे करीत आहेत.