रणधुमाळी | ‘लाल परिवारा’मधून १३ रिंगणात | देवीलाल, भजनलाल आणि बन्सीलाल यांच्या कुटुंबांमध्ये संघर्ष

0
21
माजी उपपंतप्रधान देवीलाल, माजी मुख्यमंत्री भजनलाल आणि बन्सीलाल यांची कुटुंबे हरयाणाच्या राजकारणात अत्यंत प्रभावशाली मानली जातात. विधानसभा निवडणुकीत तिन्ही कुटुंबांसह १३ उमेदवार रिंगणात असून, त्यातील काही जण एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. राज्याच्या राजकारणाची लिपी या घराण्यांच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण मानली जाते.भजनलाल कुटुंबातील तिघे रिंगणात माजी मुख्यमंत्री भजनलाल यांच्या कुटुंबातील तीन सदस्यही रिंगणात आहेत. कालकाचे तीन वेळा आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री असलेले त्यांचे ज्येष्ठ पुत्र चंद्रमोहन आता पंचकुलातून काँग्रेसचे उमेदवार आहेत.

 

चंद्रमोहन यांनी २०१९ मध्ये पंचकुलातून निवडणूक लढवली होती, पण भाजपा ज्ञानचंद गुप्ता यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. भजनलाल यांची नात भव्य बिश्नोई ही आदमपूरमधून भाजपाची उमेदवार आहे, ज्या जागेवर भव्याचे वडील कुलदीप यांनी यापूर्वी चार वेळा प्रतिनिधित्व केले होते. दोन वेळा आमदार राहिलेले भजनलाल यांचे पुतणे दुरा राम (६६) फतेहाबादमधून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांच्या कुटुंबात चुरशीची लढत होणार आहे. त्यांची नात श्रुती चौधरी ही तोशाममधून भाजपाची उमेदवार आहे आणि तिचा चुलत भाऊ अनिरुद्ध चौधरी यांच्याशी सामना होईल, जो काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. श्रुती ही बन्सीलाल यांचा धाकटा मुलगा सुरेंद्र सिंग यांची मुलगी आहे, तर अनिरुद्ध हा त्यांचा मोठा मुलगा रणबीर महेंद्रचा मुलगा आहे.
देवीलाल यांचा सारा परिवार मैदानात
माजी उपपंतप्रधान देवीलाल यांच्या कुटुंबाचा राजकीय वारसा त्यांचा नातू अभय चौटाला यांनी राष्ट्रीय लोकदलाचे नेतृत्व करीत आणि त्यांचे पणतू आणि माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी जननायक जनता पक्षाचे नेतृत्व केले. ओमप्रकाश चौटाला यांचा मुलगा अभय चौटाला एलनाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. २०१० पासून ते या जागेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. रानियामध्ये नॅशनल लोकदलाने अभय चौटाला यांचा मुलगा अर्जुन चौटाला यांना उमेदवारी दिली आहे, जे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. देवीलाल यांचा चौथा मुलगा जगदीशचंद्र यांचा मुलगा आदित्य सिहाग यांना डबवली विधानसभेतून लोकदलाने उमेदवारी दिली आहे. देवीलाल यांचे पुतणे कमलवीर सिंह यांचा मुलगा अमित सिहाग हेही डबवलीतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. देवीलाल यांचा मोठा मुलगा प्रताप सिंह चौटाला यांची सून सुनैना चौटाला फतेहाबादमधून इनेलोद उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे.

 

 

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here