मध्य प्रदेशातील सागर येथे एकाच कुटुंबातील सर्व महिलांचा एकाच रात्री मृत्यू झाल्याची रहस्यमय घटना घडली आहे. घरात तीन महिला आणि एक मुलगी होती. सर्वांनी – आपापल्या कुटुंबियांसोबत आनंदाने जेवण – केले आणि झोपायला गेले. रात्रीत असे भयंकर घडले की तीनही महिलांचे मृतदेह – विहिरीत लटकलेल्या अवस्थेत आढळून – आले, तर मुलगी मृतावस्थेत विहिरीत तरंगताना आढळून आली.
मध्यप्रदेश पोलीस या गूढ घटनेचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये – दोन बहिणी, त्यांची आई आणि एका – बहिणीची सहा वर्षांची मुलगी यांचा समावेश आहे. या महिलांचे भयावह – अवस्थेत मृतदेह सापडले. दोन मृत महिला विहिरीत दोरीला लटकलेल्या, तर एक जवळच्या लाकडी खांबाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. लहान मुलगी विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आली. विशेष म्हणजे सख्ख्या बहिणी या सख्ख्या जावा होत्या. दोन्ही बहिणींचे एकाच घरात दोघा भावांशी लग्न झाले होते.