विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाची ऑफर | केंद्रीय मंत्री नितीन गडकारींचा खळबळजनक गौप्यस्फोट

0
20
नागपुर : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, परंतु त्यांनी ती नाकारली, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केला. पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रसारमाध्यमांना संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले, मी विरोधी पक्षातील त्या नेत्याला स्पष्ट शब्दात सांगितले की मी एक विचारधारा आणि श्रद्धा मानणारी व्यक्ती आहे.

 

 

मी अशा पक्षात आहे ज्याने मला जे हवे होते ते सर्व दिले आहे. ज्या गोष्टींची मी कल्पनाही केली नव्हती. त्यामुळे कोणताही प्रस्ताव मला मोहात पाडू शकत नाही. असे सांगत मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक राहात पंतप्रधान पदाचा ऑफर धुडकावून लावली, असे गडकरी म्हणाले.
विजयरथ रोखला लोकसभा निवडणुकीत
भाजपला पूर्ण बहुमत मिळू शकले नाही. त्यामुळे गडकरींच्या दाव्यात बळ होते असे मानण्यात येत आहे. भाजपला केवळ २४० जागा मिळाल्या. तेलगू देशम आणि जेडीयूसारख्या पक्षांच्या मदतीने आघाडी सरकार स्थापन करावे लागले आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती बहुमत मिळाले होते.
मी तत्वाशी तडजोड करणार नाही
नितीन गडकरी यांनी या विरोधी पक्षनेत्याचे नाव मात्र सांगितले नाही. ते म्हणाले की २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एका वरिष्ठ विरोधी पक्षनेत्याने माझ्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी असे मानले जात होते की भाजप पूर्ण बहुमत मिळवू शकणार नाही.सरकार स्थापन करण्यासाठी काही विरोधी पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता भासू शकते. मी त्या नेत्याला स्पष्टपणे सांगितले की मी काही तत्वांमध्ये वाढलो आहे आणि मी त्यांच्याशी तडजोड करणार नाही, असे गडकरी म्हणाले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here