म्हसरूळ शिवारात रासबिहारी लिंक रोडवर असलेल्या – एका निर्जन भागातील बंद बंगल्यात अवैधरीत्या दडवून ठेवलेला चंदनाचा मोठा साठा वनपथकाने हस्तगत केला आहे. सुमारे ४५ लाख रुपये किमतीची तीन हजार किलो चंदनाची लाकडे पथकाने छापा टाकून जप्त केली आहेत. या प्रकरणी शिवाल्य ट्रेडर्सचे संचालक संशयित गोपाल रामलाल – शर्मा (५५, रा. गुलमोहरनगर, म्हसरूळ) यांच्याविरुद्ध अवैध चंदन साठवणूक व वाहतूक केल्याप्रकरणी नाशिक – वनपरिक्षेत्र कार्यालयात वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक वनवृत्ताचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन – यांच्या शासकीय निवासस्थानात गुरुवारी (दि. १२) मध्यरात्री काही अज्ञात लोकांनी प्रवेश करून – चंदनाच्या चार झाडांची कत्तल केली होती. रंजन यांनी या प्रकरणी उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, – विभागीय वनाधिकारी विशाल माळी(दक्षता), सहायक वनसंरक्षक प्रशांत
खैरनार यांची बैठक घेत स्वतंत्र तपास करण्याचा आदेश दिला होता. यानुसार पथकाने तपास सुरू केला.
नाशिक व वणी दक्षता पथकाने पेठमध्ये गोपनीयरीत्या माहिती काढली असता, नाशिकच्या पंचवटी भागातील शिवाल्य ट्रेडर्सचे नाव समोर आले. मात्र, त्याचा अचूक ठावठिकाणा दक्षता पथकाला सापडत नव्हता.