घटनेची माहिती अशी, मर्चेंट तांडा नजीक शेतातमध्ये एकत्र कुटुंबात सदर विवाहिता राहत होती. तिचे पती आणि सासरे बाजारहाट करण्यासाठी गावात गेले होते. तसेच कुटुंबातील अन्य सदस्य कामानिमित्त शेतात गेले होते. घरात कोणी नसल्याचे पाहून अक्षता जंगलगी हिने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.

काही वेळाने ही घटना कुटुंबातील सदस्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.