प्रियकरासोबत पाहिल्याने मुलीने जन्मदात्या आईलाच संपवले

0
15
Crime scene barricade covering. Murder case of a criminal young male.

प्रियकरासोबत नको ‌त्या अवस्थेत आईने रंगेहाथ पकडल्याने रागापोटी प्रियकराच्या मदतीने मुलीनेच आईची हत्या केली. ही घटना खालापूर तालुक्यातील परखंदे येथील धनगरवाडा येथे १० सप्टेंबर रोजी घडली. संगीता मारुती झोरे असे मृत महिलेचे नाव आहे. आईच्या हत्येबाबत मुलगी भारती आणि प्रियकर संतोष दत्तात्रेय नांदगावकर यांना खालापूर पोलिसांनी अटक केली आहे. खालापूर न्यायालयाने त्यांना १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

संगीता या आपल्या दोन मुलींसह येथे वास्तव्यास होत्या. मोठी मुलगी भारती हिचे वावोशी येथील संतोष नांदगावकर याच्यासोबत प्रेम प्रकरण आहे. १० सप्टेंबरला भारती हिचा प्रियकर संतोष हा घरी आला होता.रात्रीच्या वेळी दोघांमधील शारीरिक संबंध आईने पाहिले. यावेळी आई आरडाओरडा करेल म्हणून भारती आणि संतोष यांनी तिला खाली पाडून नाकावर घोंगडीने दाब देत तिची हत्या केली.
आत्महत्येचा बनाव
हत्या केल्यानंतर दोघांनी संगीता यांचा मृतदेह घरातील चुलीच्या ठिकाणी असलेल्या पाइपला साडीचा फास लावून लटकवला आणि आईने आत्महत्या केल्याचा बनाव केला. या दोघांनी केलेल्या कृत्याची भारतीची लहान बहीण साक्षीदार होती. तिने ही बाब पोलिसांना सांगितल्याने दोघांचे कृत्य उघड झाले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here