‘सैराट’ची पुनरावृत्ती,बहिणीसोबत प्रेमसंबंधाच्या रागातून खून

0
2

बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून तरुणाला खदानीत ढकलून देत ठार मारले. शुक्रवारी (दि. २०) सकाळी साडेआठ वाजता देहूरोड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ट्राय जेसुस चर्चच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी ही घटना उघडकीस आली. दरम्यान, देहूरोड पोलिसांनी तपासचक्रे फिरवत तिघांना अटक केली.

अजय जोगिंदर लुक्कड (वय २१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुणाल चंदू सकट (वय १८), प्रेम सचिन मोरे (वय १९), ओमकार उर्फ गणेश रवींद्र पवार या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहूरोड-कात्रज बायपास रोडवर असलेल्या ट्राय जेसुस चर्चच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खदान मध्ये शुक्रवारी सकाळी एका तरूणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, अजय लुक्कड हा तरुण मृतावस्थेत आढळून आला.
अजय याचा खून केल्याची शक्यता लक्षात घेत देहूरोड पोलिसांनी तपास केला. काही वेळेत पोलिसांनी तीन जणांना संशयावरून ताब्यात घेतले. अजय लुक्कड याचे आरोपी कुणाल सकट याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. त्या कारणावरून कुणाल याने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून अजय याला देहूरोड पोलीस ठाण्याजवळील खदानीजवळ बोलावून घेतले. तिथून आरोपींनी अजयला खदानीत ढकलून खून केल्याची कबुली दिली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here