‘सैराट’ची पुनरावृत्ती,बहिणीसोबत प्रेमसंबंधाच्या रागातून खून

0
18

राज्यभरात अनेक ठिकाणी प्रेमसंबध संशयाचे प्रकरणे ताजी असचानाच सैराट फिल्मचे नाट्य प्रत्यक्षात उतरलेची घटना समोर आली आहे.बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तिघांनी मिळून एका तरुणाला खदानीत ढकलून देऊन खून केल्याचा प्रकार ट्राय जेसुस चर्चच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी उघडकीस आली. दरम्यान, देहूरोड पोलिसांनी तपासचक्रे फिरवत तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

अजय जोगिंदर लुक्कड (वय २१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुणाल चंदू सकट (वय १८), प्रेम सचिन मोरे (वय १९), ओमकार उर्फ गणेश रवींद्र पवार या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड-कात्रज बायपास रोडवर असलेल्या ट्राय जेसुस चर्चच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खदान मध्ये एका तरूणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, अजय लुक्कड हा अरुणाचल मृत्तदेह आढळून आला.
अजय याचा खून झाल्याची शक्यता लक्षात घेत देहूरोड पोलिसांनी तपास केला.काही वेळेत पोलिसांनी तीन जणांना संशयावरून अटक केली. अजय लुक्कड याचे संशयितापैंकी एकाच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते.त्या संशयावरून कुणाल याने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून अजय याला देहूरोड पोलीस ठाण्याजवळील खदानीजवळ बोलावून घेतले. तिथून आरोपींनी अजयला खदानीत ढकलून खून केल्याची कबुली संशयितांनी दिली.पोलीस अधिक तपास करत आहेत.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here