उमदी,संकेत टाइम्स : जत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या पक्षाकडून उमेदवारी मागणार असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे जत तालुका नेते माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड.चन्नाप्पा होर्तीकर यांनी सांगितले
ॲड. होर्तीकर म्हणाले, आम्ही गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाचा प्रामाणिकपणे काम करत आहोत आमच्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असून त्यांच्या माध्यमातून पक्षाच्या उन्नती बरोबर तालुक्याचा अनेक विकासकामे झाले आहेत.
जत विस्तारित सिंचन योजनेच्या कामाची अनेकांनी श्रेय घेत आहेत मात्र जयंत पाटील यांनी जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या विशेष प्रयत्नाने पाणी शिल्लक असल्याची खात्री करून जत तालुक्याच्या वाट्याला 6 टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले आहे. हे कुणी विसरता कामा नये असे सांगून होर्तीकर म्हणाले, आम्ही जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे बाबा कै.कॉ. कल्लापाण्णा होर्ती व कै. रामचंद्र होर्तीकर यांच्या प्रेरणेने शैक्षणिक क्षेत्रात सर्वोदय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जत तालुक्याच्या दुष्काळी सीमा भागात उत्तुंग यश प्राप्त केले आहे.
आज आमच्या सर्वोदय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुमारे पन्नासहून अधिक शाखा असून जत बरोबर मंगळवेढा तालुक्यातील शाखा असून या परिसरातील गोर गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे,असे सांगून पुढे म्हणाले, पहिली पासून उच्च शिक्षणापर्यंत कन्नड व मराठी माध्यम शाळा चालवली जात असून डिप्लोमा, मेडिकल साईडच्या शाळाही आहेत.
सध्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत तालुक्यातील अनेकांनी अनेक पक्षात उमेदवारीसाठी इच्छुक आहेत सद्या राज्यात आमची महाआघाडी आहे आणि जत विधानसभेत विद्यमान आमदार काँग्रसचे आहेत मात्र कै. राजाराम बापू पाटील यांना मानणारा तालुका आहे त्यांच्या प्रेरणेने आमचे नेते जयंत पाटील यांनी कायमस्वरूपी जत तालुक्याकडे आपलेपणाचा वागणूक दिली आहे त्यामुळे यावेळी आघाडीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाला जत विधानसभा मतदार संघाची जागा सोडल्यास मी ताकतीने निवडणुकीत उतरू असेही होर्तीकर म्हणाले.