सांगली राज्यातील सर्व ग्रामपंचायतीतील सरपंच व उपसरपंचांचे मानधन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने वाढले आहे. मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यातील बैठकीत हा निर्णय घेतला.गेल्या अनेक वर्षांपासून मानधनवाढीची मागणी होत होती. आमदार-खासदारांचे मानधन वाढले, तरी सरपंचांना मात्र तुटपुंज्या मानधनावरच काम करावे लागत होते.
७०० गावांच्या सरपंच, उपसरपंचांना लाभ
जिल्ह्यातील ७०० गावांचे सरपंच, उपसरपंचांना मानधनवाढीच्या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यांना दुप्पट मानधन मिळणार आहे.आठ हजारांहून अधिक लोकसंख्येच्या सरपंच, उपसरपंचांना भरभक्कम मानधन मिळेल
सरपंचांना १० हजारांपर्यंत
लोकसंख्येनुसार सरपंचांना १० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळेल.दोन हजार लोकसंख्येपर्यंतच्या गावच्या सरपंचांना सहा हजार रूपये मानधन मिळेल.लोकसंख्येनुसार उपसरपंचांना चार हजार रुपयांपर्यंत मानधन मिळेल.दोन हजार लोकसंख्येपर्यंतच्या गावच्या सरपंचांना दोन हजार रूपये इतके मानधन मिळणार आहे.
उपसरपंचांना चार हजारांपर्यंत
सरपंच, उपसरपंचांचे मानधन वाढविण्याची मागणी अनेक वर्षापासून आम्ही करीत होतो. शासनाने घेतलेल्या सध्याच्या निर्णयाचे स्वागतच आहे. परंतू गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामपंचायतींवरील व पर्यायाने सरपंचांवरील जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पंधराव्या वित्त आयोगातून कोट्यवधींची कामे होत असल्याने सरपंचांच्या कामामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मानधनवाढ करणे आवश्यक होते. आता पंचायत समिती व जिल्हा परिषदेत सरपंचांसाठी स्वतंत्र कक्ष, विधानसभेत प्रतिनिधित्व या मागण्यांचाही विचार प्रामुख्याने करणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी सरपंच, उपसरपंचांचे मानधन वाढविण्याची गरज आहे.
– तानाजी पाटील, सरपंच संघटना