आधारकार्ड महत्त्वाचा दस्तऐवज आहे. ओळखीसाठी याच्या झेरॉक्स मागितल्या जातात. परंतु, त्या चुकीच्या हातात गेल्यास दुरूपयोग होऊ शकतो. सातारा येथे लाडकी बहीण योजनेसाठी दाम्पत्याने लढवलेली शक्कल पाहता, आधारच्या साक्षांकित प्रती ज्या आस्थापनांकडे सादर केलेल्या असतात, त्यांनी प्रतींची जपणूक आणि कालबाह्य झाल्यास सुरक्षित विल्हेवाट लावण्याची गरज आहे.
हल्ली बैंक, गॅस जोडणी, रेशनकार्ड, लायसन्स, मोबाइलचे सीमकार्ड, दाखले, सेतू कार्यालय, महा ई-सेवा केंद्र, गॅस एजन्सी, वाहनाचा परवाना, बँकांत खाते उघडणे, आदी अनेक ठिकाणी आधारकार्डची झेरॉक्स लागतेच. आपले काम लवकर होण्यासाठी अनेकजण साक्षांकित प्रत देतातही. परंतु, त्यांचे पुढे काय होते.व्यवस्थित जपून ठेवल्या जातात का, याच्या फंदात नागरिक पडत नाहीत.
परंतु, आधारची झेरॉक्स चुकीच्या हातात गेल्यास मनस्ताप होऊ शकतो.आधारकार्डचा चुकीचा वापर होत असल्याने हे कार्ड देताना त्याच्यावर कोणत्या कारणासाठी वापरले जाणार आहे. याचा उल्लेख केल्यास ते फक्त त्याच कारणासाठी वापरले जाईल आणि काम संपल्यानंतर ते रद्दबातल ठरविण्यात यावे. अन्यथा गैरप्रकार वाढतच राहणार आहेत.
सत्यप्रतीवर कारणाच्या उल्लेखाचे हवे धोरण
संबंधित झेरॉक्सवर नागरिकाची सही घेतल्यानंतर ती कशासाठी हवेय, याचा उल्लेख केल्यास जोखमीचे राहणार नाही. त्या अनुषंगाने शासनाने एकदा दिलेल्या झेरॉक्सचा पुनर्वापर होणार नाही. यासाठी धोरण आखणे गरजेचे आहे.
शासनाकडून सुरक्षित विल्हेवाट; इतरांचे काय
शासनाकडून कालबाह्य कागदपत्रांची रद्दी तसेच शासनाकडे मोठ्या प्रमाणात विविध कामांसाठी हजारो कागदपत्रांच्या झेरॉक्स येत असतात.त्यांची व्यवस्थित जपणूक करण्यात येते. ठराविक कालावधीनंतर कालबाह्य झालेल्या अशा अर्ज, कागदपत्रांची विल्हेवाट लावली जाते.जिल्ह्यात पोपट जाधव व प्रतीक्षा जाधव या दाम्पत्याने विविध आधारकार्डाचा वापर व विविध पेहराव करून एकच बँक खाते क्रमांक देऊन लाडकी बहीण योजनेचे एकूण ३० अर्ज भरल्याचे समोर आल्यानंतर देशात खळबळ उडाली होती.कोणत्याही शासकीय कारणांसाठी त्याचा वापर करता येणार नाही, आदी अटींवर त्या रद्दीला दिल्या जातात.