करजगी : भिवर्गी ता. जत येथील एका विवाहित महिलेने दोन लहानग्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा दुर्देवी प्रकार रविवारी सकाळी समोर आला आहे.राजक्का धर्मराय बिराजदार(वय ३०),मुलगा विष्णू धर्मराय बिराजदार (वय ५),मुलगी माधुरी धर्मराय बिराजदार (वय २) असे मयत तिघांची नावे आहेत.याप्रकरणी उमदी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,भिवर्गी ते संख रस्त्यावरील पांडोझरी वड्याजवळ शेतात धर्मराय बिराजदार हे कुंटुबियासह राहतात.
शनिवारी दुपारी त्यांच्या पत्नी राजक्का बिराजदार व दोन लहान मुले बराच वेळ घरी आले नाहीत.त्यामुळे राजक्का व दोन्ही मुलाचा कुंटुबियांनी आसपास शोध घेतला असता विहिरीजवळ राजक्का यांची चप्पल व घागर आढळून आली.त्यामुळे कुंटुबियांनी पोलीस पाटील श्रीशैल चौगुले यांना याची माहिती दिली.पोलीस पाटील चौगुले यांनी उमदी पोलीसात वर्दी दिली.
दरम्यान घटनेचे गांभिर्य ओळखून डिवायएसपी सुनील साळुंखे,सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप कांबळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.चप्पल व घागर पडलेल्या विहिरीत कँमेरे सोडून राजक्का व मुलांचा शोध घेण्यात आला.शनिवारी रात्री उशिरा तिघाचे मृत्तदेह विहिरीत आढळून आले.तिघाचे मृत्तदेह विहिरीबाहेर काढून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.दरम्यान आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप कांबळे करत आहेत.