आमदार विक्रमसिंह सावंत
संख : गुड्डापूर ता.जत येथे कर्नाटक-महाराष्ट्र गडी प्रदेश विकास प्राधिकरण आणि कन्नड संस्कृती विभाग, कर्नाटक राज्य यांच्या वतीने ५० वा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. जत मतदारसंघ महाराष्ट्रात असला तरी येथे कन्नड भाषिकांची मोठी संख्या आहे.
कर्नाटक सरकारने कन्नड शाळांना मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात मोठा फायदा होत आहे. या कार्यक्रमामुळे कर्नाटक-महाराष्ट्र राज्यांमधील संबंध अधिक मजबूत होतील असा विश्वास यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी व्यक्त केला,व कर्नाटक मंत्रीगणाचे आभार मानले.यावेळी मंचावर कर्नाटक राज्याचे मंत्रीशिवराज तंगडगी,शिवानंद पाटील, गडीनाडू कन्नड महामंडळाचे अध्यक्ष सोमन्ना बेविनमरद व इतर शासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.