जत : रेवनाळ(ता.जत)येथील शेतकरी श्री सोपान लोखंडे या पशुपालक शेतकऱ्याच्या सोमवारी पहाटे 4 चे सुमारास लांडग्यांनी हल्ला करून 20 चांगल्या मेंढ्या व 4 लहान पिलावर लांडग्याच्या कळपाने हल्ला केला.त्यात सर्वच मेढ्या व पिले मृत्यूनुखी पडली आहेत.यात सुमारे पाच लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
लोखंडे कुटुंबाचा उदरनिर्वाह या मेंढ्यावर अवलंबून होता त्यांच मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी तात्काळ आधार म्हणून 11 हजार रूपयाची मदत लोंखडे कुंटुबियांना केली आहे.तसेच वनाधिकारी व प्रांताधिकारी यांना फोन करून योग्य ती मदत देण्याची मागणी केली आहे.