जत : राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत तालुक्यात विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत.अनेक चर्चा, तर्क वितर्काना उधाण येत आहे. अशातच विधानसभेला काँग्रेसला सक्षम पर्याय म्हणून भाजपचे नेते, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांचे नाव जनतेतून पुढे आले आहे. जमदाडे यांनीही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याची जाहीर केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. जमदाडे साहेब आत्ता आमदार होणार अशी कार्यकर्त्यातून चर्चा जोरात आहे
जमदाडे यांच्या कणखर जनसंपर्कातून ३० वर्षापासून सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ, बाजार समितीच्या सभापतीच्या कालावधीत ऐतिहासिक विकासकामे व निर्णय, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन समस्या जाणून निपटरा व ओटीएस योजनेची निर्मिती करून थकित शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ॲक्टिव्ह संचालक, केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालकपदी कार्यरत असताना वाळेखिंडी येथे किसान रेल्वे सुरू करण्याचा निर्णय, दुष्काळग्रस्त, नुकसानग्रस्त ,जळीतग्रस्त व गरजू विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी व दायित्व या नात्याने मदत करणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. आता प्रकाश पर्व अशी चर्चा युवकांच्या सोशल मीडिया बरोबर जनमानसातून येत आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असताना दुष्काळी जत व कवठेमंहकाळ या तालुक्यावर अन्यायी त्रिविभाजानाचा निर्णय न्यायालयाच्या माध्यमातून रद्दबातल केला. मार्केट कमिटीच्या सभापती पदाच्या माध्यमातून जतच्या वैभवात भर घालणारे १०४ गाळ्याचे दुमजली छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी कॉम्प्लेक्सची उभारणी करून मार्केट कमिटीच्या उत्पन्नात भर पाडली आहे.जगदजोत्ती बसवेश्वर महाराज सभागृह ,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर धान्य चाळण यंत्र व डाॅ बाबासाहेब आंबेडकर भाजी कट्टा अश्या विधायक विकास कामामुळे त्यांचे स्थान लोकभावनेशी अधोरेखित झाले आहे.
केंद्रीय रेल्वे बोर्ड पुणे व सोलापूर सदस्य या पदाच्या कालावधीत तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांचा उत्पादित शेतीमाल दिल्लीत कमी दरात वाहतूक व्हावी म्हणून किसान रेल्वे सुरू केली. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न व विविध योजनेचा लाभ मिळवून दिले आहेत.सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका त्यांच्या माध्यमातून साकारत आहे. त्याचबरोबर म्हैशाळ योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलं पाहिजे. वंचित माडग्यासह इतर गावांना पाणी मिळावे म्हणून माडग्याळ कॅनाल साठी केलेले प्रयत्न अविस्मरणीय आहेत. यामुळे आज उटगी येथील दोड्डनाला तलाव म्हैशाळच्या पाण्याने भरला जात आहे. सदरचे काम होऊन नेय म्हणून काहींनी राजकीय शक्ती पणाला लावली. परंतु तत्कालीन खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून हा विरोधकांचा प्रयत्न हाणून पाडला. या कामामुळे जमदाडे यांचे शेतकऱ्यातून कौतुक होत आहे.
माजी आमदार विलासराव जगताप यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांचा पराभव जमदाडे यांनी केला . त्यामुळे जनतेतून प्रकाश जमदाडे हेच आमदार सावंत यांचा पराभव करू शकतात ही धरणा झालेली आहे. आज पर्यंत आपल्या चाणक्य नीति मुळे ज्या ज्या निवडणुका लढवले आहेत त्या निवडणुकीत विजय प्राप्त केला आहे.सवलतीच्या दरात घरगुती आटा चक्की,सायकल वाटप केल्या जात आहेत.
लोकभावनेची नाळ जोडलेला नेता.सामाजिक दायित्व बांधिलकी या भावनेतून प्रकाशराव जमदाडे युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून वृत्तपत्र विक्रेता दिन,अभियंता दिन,शिक्षक दिन,जागतिक महिला दिन, कृषी दिन, कारगिल दिन, वेगवेगळ्या समाजाचे उपयोग असणारे समाजाच्या समाजामध्ये वेगवेगळ्या घटकांमध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांना सन्मान करून त्या लोकांना ऊर्जा देण्याचे काम प्रकाश जमदाडे यांच्या माध्यमातून केले जात आहे. या कामामुळे जमदाडे यांच्या नावाची चर्चा जत तालुक्यात जोरात सुरू आहे व त्यांचे पारडे जड आहे त्यामुळे भाजप हा त्यांनाच उमेदवारी देऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.