युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कामाण्णा बंडगर
जत विधानसभा मतदारसंघात भाजप पक्ष तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी ज्यांनी शिस्तबद्ध काम केले आहे, ते भूमिपुत्र तम्मनगौडा रवी पाटील हेच भाजपच्या उमेदवारीचे खरे हक्कदार असल्याचे मत भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस कामण्णा बंडगर यांनी व्यक्त केले. कामण्णा बंडगर म्हणाले, जत विधानसभा मतदारसंघात सध्या उमेदवारीवरून जोरदार चुरस सुरू झाली आहे. मात्र मागील दोन वर्षात भारतीय जनता पार्टीला जत मतदारसंघात अवकळा आली होती.
जत विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी घेतल्यानंतर तम्मनगौडा रवीपाटील यांनी तालुक्यातील प्रत्येक बुथपर्यंत मजबूत पक्ष बांधणी केली आहे. सर्व बुथप्रमुख व पदाधिकारी यांची सुनियोजित बांधणी केली आहे.मोदी @9 अभियान, नमो चषक अशा उपक्रमांमध्ये त्यांनी आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र राज्यातील पहिली वॉर रूम स्थापन करण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे नमो ॲप नोंदणीमध्ये जत विधानसभा पश्चिम महाराष्ट्रात आघाडीवर आहे. रवीपाटील यांनी काढलेली जनकल्याण संवाद पदयात्रा ऐतिहासिक ठरली आहे. तालुक्यातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी व तालुक्यातील समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी 350 किलोमीटरचा प्रवास पायी चालून एक इतिहास घडवला आहे. तालुक्यातील भूमिपुत्र व विकासाचे व्हिजन असलेला नेता म्हणून तम्मनगौडा रविपाटील यांना तालुक्यातील प्रत्येक मतदारांची पसंती आहे. अशावेळी भाजपने बाहेरचा उमेदवार लादून तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यावर अन्याय करू नये. यावेळी बाहेरचा उमेदवार स्वीकारण्याची तालुक्यातील कोणत्याच मतदारांची मानसिकता नाही. तालुक्यातील भाजपच्या सर्व ज्येष्ठ व प्रमुख नेत्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा ला 7000 मतांचे मताधिक्य मिळाले आहे. सध्या तालुक्यात भाजपला पोषक वातावरण असताना बाहेरचा उमेदवार लादल्यास भारतीय जनता पार्टीची उमेदवारी धोक्यात जाण्याची शक्यता आहे हे आम्ही खपवून घेणार नाही. जत तालुक्यामध्ये बाहेरचा उमेदवाराच्या हस्तक्षेपामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी आहे. असे कामाण्णा बंडगर म्हणाले.