जत : जत तालुक्यातील समस्त लिंगायत समाज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी ठाम असून त्यांच्या विजय निश्चित असल्याचे मत लिंगायत समाजाचे तालुकाध्यक्ष महादेव हिंगमिरे यांनी व्यक्त केले.जत तालुक्यात मोठ्या संख्येने असलेला दुर्लक्षित लिंगायत समाजाचे आराध्य दैवत असलेले महात्मा बसवेश्वर यांच्या जत येथील चौक व स्मारक शुशोभिकरण ७५ लाख,श्री.दानम्मादेवी देवस्थानला ५ कोटी,बिळूर येथील भैरवनाथ मंदिरासाठी ३ कोटीचा निधी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिळवून दिला आहे.त्याचबरोबर अनेक गावातील लिंगायत स्मशानभूमी साठी निधी मिळवून दिला आहे.
गोरगरिब लिंगायत समाजाच्या बांधवांसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून लिंगायत समाजला न्याय दिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय दिला आहे.लिंगायत समाजाचा कुंबहुना जत तालुक्याचा विकास साधायचा असेल तर आमदार गोपीचंद पडळकर सारखा दुसरा नेता नाही.सामान्य लोकांची कदर असणाऱ्या आ.पडळकर यांचा विजय निश्चित आहे.जत तालुक्यातील सर्व लिंगायत समाज गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी ठामपणे राहणार आहेत.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आ. पडळकर यांना विजयी करून तालुक्याचे नाव राज्यात झळकाविण्यासाठी राज्याची मुलुख मैदान तोफ असलेले आमदार गोपीचंद पडळकर यांना जत तालुक्यातून विधानसभेवर पाठवावे लागणार आहे.त्यासाठी तालुक्यातील युवक,महिला,बुजुर्ग नागरिक यांनी आपले मत योग्य माणूस असलेले आमदार पडळकर यांना द्यावे असे आव्हान हिंगमिरे यांनी केले.