वंचित बहुजन आघाडीने छाननीत पक्षाच्या नावानिशी भरलेले नागनाथ क्षीरसागर व माजी आमदार रमेश कदम यांचे अर्ज नामंजूर झाले. परंतु या दोघांनीही अपक्ष भरलेले फॉर्म मात्र मंजूर झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीत बहुतांश मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहोळ मतदारसंघात सूचक कमी असल्याने वंचितच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला आहे. या अजब कारणाची चर्चा चांगलीच रंगली. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून बहुजन वंचित आघाडीकडून अतुल वाघमारे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जाला पुरेसे सूचक नसल्याने एकमेव त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. छाननीत नागनाथ क्षीरसागर यांचे चिरंजीव सोमेश क्षीरसागर यांनी यशवंत माने मूळ शेळगावचे आहेत.
त्यांनी हल्लीचा वास्तव्याचा पुरावा तालुक्यातील मुंढेवाडीचा दाखविला आहे. परंतु त्यांचा जातीचा दाखला बुलढाणा तालुक्यातील चिखली येथून काढला आहे. त्यामुळे ते प्रमाणपत्र चुकीचे आहे, अशी हरकत घेतली होती. या हरकतीवर निर्णय देताना निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी यशवंत माने यांचे प्रमाणपत्र चुकीचे आहे किंवा नाही हे ठरविण्याचे आम्हाला अधिकार नाही.कलम पाचनुसार ते अधिकार आम्हाला नसल्याने यशवंत माने यांचा उमेदवारी अर्ज वैद्य केला असल्याचा निकाल त्यांनी दिला.
नागनाथ क्षीरसागर यांच्या वतीने सोमेश क्षीरसागर यांनी विद्यमान आमदार यशवंत माने यांचे प्रमाणपत्र चुकीचे असल्याचे घेतलेल्या हरकतीवर सेक्शन ५ नुसार त्यांचे प्रमाणपत्र चुकीचे आहे किंवा नाही हे ठरविण्याचे अधिकार आम्हाला नसल्याने यशवंत माने यांचा अर्ज वैध असल्याचे सांगत निवडणूक निर्णय अधिकारी होळकर यांनी यशवंत माने यांचा अर्ज मंजूर केला आहे.