जतमध्ये चंद्रकांतदादांच्या भेटीनंतरही रवीपाटील लढण्यावर ठाम

0
240

जत : जतमध्ये अखेर तम्मणगौडा रवीपाटील यांचे बंडखोरी निश्चित झाली आहे.आज भाजपचे नेते माजी मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी जतमध्ये नाराज नेत्याची भेट‌ घेत उमेदवारी माघारी घेण्याची विंनती करत यापुढे पक्ष तुमची ‌योग्य दखल घेईल असे आश्वासन दिले.

जत येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बंडखोर नेत्याची भेट घेत बंडखोरी रोकण्यासाठी प्रयत्न केले.

त्यांनी महामंडळ आणि विधानपरिषदेचं आश्वासन दिले,मात्र विलासराव जगताप,तम्मणगौडा रवीपाटील यांनी भूमिपुत्राला उमेदवारी द्यावी अशी आम्ही यापुर्वी पक्षाकडे मागणी केली होती.पक्षाने आमची दखल घेतली नाही.त्यामुळे आम्ही अपक्ष लढणार हे निश्चित असल्याचे ‌त्यांनी सांगितले.येत्या दोन दिवसात तालुक्यात दौरे चालू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान भाजप नेतृत्वाकडून निरोप घेऊन आलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांना जतमधिल बंडखोरी रोखण्यात यश आलेले ‌नाही.त्यामुळे पक्षाकडून आणखीन कोन बंडखोर भाजपा नेत्यांची मनधरणी करणार का,थेट कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here