जत : जत भाजपातील बंड शमविण्यासाठी भाजपाचे बडे नेते मंत्री चंद्रकांत पाटील हे आज जत दौऱ्यावर होते.जत तालुक्यात आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक भाजपा नेत्यांनी बंडांचा झेंडा उभारला आहे.भाजपाचे एक बडे नेते प्रकाशराव जमदाडे हेही भाजपाकडून लढण्यास इच्छुक होते,पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितली होती.मात्र पडळकर यांना उमेदवारी मिळाल्याने तेही नाराज आहे.त्यामुळे नेमके अपक्ष लढणार की माघार घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
त्यातच काल कॉग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी जमदाडे यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली.खा.पाटील विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत याचा निरोप घेऊन जमदाडे यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू असतानाच भाजपाचे बडे नेते असलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज प्रकाशराव जमदाडे यांच्या घरी भेट देत नाराज जमदाडे यांच्याशी चर्चा केली.
त्यात पाटील यांनी महायुतीचे उमेदवार पडळकर यांना साथ द्यावी,पक्ष तुमचा सन्मान करले,असे आश्वासन दिले आहे.जमदाडे यांची दोन्ही उमेदवारांच्या नेत्यांनी भेट घेतल्याने तालुक्यात चर्चेला उधान आले असून राजकारणातील मसुद्दी,चाणक्य असलेले जमदाडे नेमका काय निर्णय घेतात,याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.