१.०९ कोटीचा मुद्देमाल,४३ जणांवर गुन्हा | सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलीसाचा छापाा

0
173

सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकत तब्बल १.०९ कोटींचा मुद्देमाल जप्त करत ४३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीत असणाऱ्या महामार्गाशेजारी हा अड्डा सुरू होता.

गुरुवारी मध्यरात्री पोलीसांनी छापा टाकत‌ ही कारवाई केली आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळपर्यंत कारवाई सुरू होती. या छाप्यात रोकड, जुगार साहित्य, विदेशी दारू, मोबाईल, ६ आलिशान कार, १४ दुचाकी असा सुमारे १ कोटी ९ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी जुगार अड्ड्याचे मालक, चालक यांच्यासह ४५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी परिक्षेत्रातील हा दुसरा दणका दिला आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here