भक्तीमय वातावरणात लक्ष्मीपुजन

0
6

जत,प्रतिनिधी: दिवाळीतील महत्वाची पुजा असणारी लक्ष्मी पुजा तालुकाभर भक्तीमय वातावरणात संपन्न झाली.दिवाळीची मुख्य दिवस म्हणून लक्ष्मी,कुबेर पुजनाचा दिवस मानला जातो.यंदा हा दिवस पहिल्या अंगोळीच्या दिवशी आला आहे.त्यामुळे दिवाळीचे कमी झाले आहेत.

जत शहरासह,तालुक्यातील गावागावात दुकाने,उद्योग,व्यवसायिक,त्याशिवाय घरोघरी विधीवत लक्ष्मी पुजन उत्साहात करण्यात आले. सर्वांनी लक्ष्मीची पुजा करत आपल्या उद्योग,धंद्यात,घरात सुख,शांती लाभो,व्यवसायात बरकत देण्याचे साकडे घातले. जत तालुक्यातील सर्वच गावातील नागरिक, व्यापारी वर्ग रविवारी लक्ष्मी पुजनाची सकाळ पासून तयारी केली होती.

दुकानदारांनी आपला व्यवसाय उरकून लक्ष्मी पुजनाची अचूक वेळ साधली.भारतीय संस्कृतीत ऐश्‍वर्य आणि भौतिक सुखाचं प्रतीक म्हणून लक्ष्मीदेवीची पूजा केली जाते. वैदिक साहित्यापासून पौराणिक साहित्यातही सौभाग्याची देवी म्हणजे श्री लक्ष्मी मानली गेली आहे. तिचे स्वरूप, तिचे अलंकार, तिचे गुणधर्म यासंदर्भात अनेक विवेचने उपलब्ध आहेत. भारतीय मनीषेची समृद्धी, कल्याण, आनंद यांच्याशी आस्था जोडणारी ही एक विशिष्ट शैली आहे.

प्राचीन कालखंडात भारतीय जिथे जिथे गेले तिथे त्यांनी आपल्यासोबत आस्था, विश्‍वास, सचेतन असणार्‍या भारतीय परंपरा नेल्या. या परंपरा काळाच्या ओघात बहरल्या. या दिवशी बळीच्या बंदिवासातून सुटका झालेल्या लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरी कायम राहावे म्हणून मोठ्या भक्‍तिभावाने लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे.दुकानासमोर केळीची रोपे,नारळाच्या फरक्या,फुंलाच्या माळा,आंब्याची पाने,कवट,पुजनाचे साहित्य, दिवाळी फरळाचा नैवेद्य दाखविण्यात आला.

रात्री लक्ष्मीपुजन झाल्यानंतर दुकाने बंद करण्यात आली आहे. ती आज उत्तर पुजा झाल्यानंतर सुरू होतील.लक्ष्मीपुजनानंतर फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.यंदा पावसाने साथ दिल्याने दिवाळीचे व्यापाऱ्यांना चांगले ग्रांहक मिळाले आहेत.गुरूवारपासून रविवार पर्यत जतची महत्वाच्या बाजारपेठेत मोठी गर्दी होती.त्यामुळे लक्ष्मीपुजनाला व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यांवर आंनद दिसत होता.

तालुक्यातील संख,डफळापूर, उमदी,शेगाव,माडग्याळ,बिंळूर,या प्रमुख गावातील बाजारपेठात ग्राहकांनी बुधवारी सकाळ पासून गर्दी होती.लक्ष्मी पुजनाचे साहित्य,वह्या,कँलेडर, फुले,फुलाचे हार,नारळ खरेदी सुरू होती.त्यापुर्वी अगोदरचे दोन दिवस इतर खरेदी करण्यात आली.

संख येथे लक्ष्मीपुजनाचे साहित्य खरेदी करताना व्यापारी, नागरिक

लक्ष्मी पुजन फोटो वापरा

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here