वद्धाच्या अत्याचारातून बारावर्षीय मुलगी प्रसूत | मृत अर्भकास जन्म दिला, वृद्धास अटक

0
360
Crime danger disgrace scandal shame breaking news newspaper urgent headline background.

आटपाडी तालुक्यातील एका गावात बारा वर्षे वयाच्या मुलीवर वृद्धाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या मुलीने बुधवारी मृत अर्भकास जन्म दिला. याबाबत पीडितेच्या आईने शिवाजी दादा हगवणे-भोसले (वय ६०, रा. भोसले मळा, खवासपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्याविरोधात वडूज पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पीडित मुलगी आई-वडिलांसोबत भाड्याच्या घरात राहते. त्यांच्या घराजवळील एका मंगल कार्यालयात संशयित शिवाजी हा आचारी म्हणून काम करतो.पीडितेचे कुटुंबीय व त्याची चांगली ओळख होती. मार्च महिन्यात अल्पवयीन मुलीचे आई- वडील कामावर गेले होते. ती घरी एकटीच होती.

त्यावेळी शिवाजीने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिली. मुलगी गर्भवती असल्याचे समजताच पालकांनी वडूज (जि. सातारा) येथे तिची बुधवारी प्रसूती केली. तिने पुरुष जातीच्या मृत अर्भकास जन्म दिला. त्यानंतर आईने वडूज पोलिस ठाण्यात शिवाजीविरोधात फिर्याद दिली. तेथे गुन्हा नोंद होऊन पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांत वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी शिवाजीला अटक केली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here