मोठ्या नेत्याचा सुरेशभाऊ खाडेंना पाठिंबा | मिरज आणखीन सेफ

0
205

मिरज मतदार संघात पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या अडचणी वाढविण्याचा प्रयत्न विरोधी गटाकडून होत असतानाच महाराष्ट्र राज्याचे माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरेशभाऊ यांना पाठिंबा दिला.यामुळे खाडेंना मिरजेत आणखीन मजबूत ताकत मिळाली असून पुन्हा एकदा त्यांना विजयी मिळवता येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी व सर्वसामान्य घटकासाठी काम करीत असताना ते सदैव सोबत होते मात्र आज जाहीर पाठिंबा दिल्याने नक्कीच मोठे पाठबळ मिळाले आहे. मिरज विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान अमूल्य राहिले आहे. त्यांची अभ्यासू साथ या निवडणुकीत यश मिळवून देण्यात बहुमोल ठरेल हा विश्वास आहे,असे यावेळी सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितले. यावेळी जनसुराज्यचे समितदादा कदम, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंदभाऊ देशपांडे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे,राजवर्धन घोरपडे उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here