जत : जत तालुक्याच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर याच्या पाठीशी जत तालुक्यातील लिंगायत बांधवानी राहावे असे आवाहन प्रदेश प्रवक्ता शिवानंद हैबतपुरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
पुढे बोलताना शिवानंद हैबतपुरे म्हणाले की,जत विधानसभा निवडणुकीत विरोधकांना हितासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांनी जो उमेदवार उभा केला आहे.त्याच्या पाठीमागे एकटेच उभे आहेत आणि त्यांनी भूमिपुत्राच्या नावाने जो उमेदवार उभा केला आहे. त्याच्या पाठीशी न राहता लिंगायत समाजाचे मत विभागणी होऊन विरोधी पक्षास फायदा होईल असे केलेला अंदाज जत तालुक्यातील समाज बांधव खोटा ठरवतील लिंगायत आणि धनगर याचे इतिहासात देखील ऋणानुबंध आहेत.
जेथे शिव आहे तेथे मल्हार येतोच त्यामुळे लिंगायत आणि धनगर बांधव निश्चित महायुतीचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांना साथ देतील यात शंका नाही.आम्ही आमदार पडळकर याच्यासाठी जत विधानसभा मतदार संघात गावनिहाय दौरा सुरु करत असून विरोधी पक्षाचा अझेंडा हाणून पाडला जाईल,असेही शिवानंद हैबतपुरे म्हणाले.
या पत्रकार परिषदेत चंद्रशेखर गोब्बी,सरपंच वसुधा हिंगमिरे,रमेश बिरादार अनिल पाटील, राजेंद्र आरळी,राजु कामातगी, खोजनवाडी सरपंच कुमार लांडगे,डॉ.ममता तेली,लिंगायत नेते महादेव हिंगमिरे हे उपस्थित होते.
फोटोओळी
जत येथे पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेश प्रवक्ता शिवानंद हैबतपुरे व लिंगायत समाजाचे प्रमुख नेते