जतमध्ये विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांचे पारडे दिवसेन् दिवस जड होतानाचे चित्र आहे.नुकताच जिल्हा बँकेचे संचालक व भाजपचे नेते प्रकाश जमदाडे यांनी जत विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत यांना पाठिंबा जाहीर केला.
जमदाडे कार्यकर्त्यांची यांनी बैठक त्यांच्या मंगळवारी बोलाविली होती. या बैठकीत त्यांनी घोषणा केली.भाजपाकडे जत विधानसभा उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, पक्षाने संधी नाकारली. जत तालुक्यात भाजपाने बाहेरचा उमेदवार लादला. मी कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठा झालेलो आहे. कार्यकर्त्यांची मते अजमावून घेतली.
त्यावेळी सर्वाधिक कार्यकर्त्यांनी आमदार सावंत यांना पाठिंबा देण्याचा आग्रह केला. त्यानुसार आम्ही विक्रमसिंह सावंत यांना पाठिंबा जाहीर करीत आहोत, अशी माहिती प्रकाश जमदाडे यांनी दिली.