जत : येणाऱ्या २३ तारखेला आपले महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. सरकार येताच म्हैशाळ योजना,टेम्भू योजना यासाठी संपूर्ण आराखडा तयार असून प्रत्यक्षात काम सुरु करण्याचे बाकी आहे. अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही सगळ्यांनी बसून म्हैशाळ योजनेचा आरखडा तयार केला होता. पण हुकूमशाही पद्धतीने आपले गोर – गरिबांचे सरकार पाडण्यात आले. त्यांनतर या जुमला सरकारने जत तालुक्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
पण येत्या २३ तारखेला आपले सरकार येणार असून, १ वर्षात जत पूर्व भागाची पूर्णपणे तहान भागविली जाणारा असल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी जतवासियांना दिला.
तसेच मागच्या २५ वर्षात जी कामे झाले नाही त्या पेक्षा तिपटीने काम या ५ वर्षात विक्रमदादांनी केले असे प्रतिपादन जयंत पाटील यांनी केले.
व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)प्रदेशाध्यक्ष मा. आ. जयंतराव पाटील,कर्नाटक विधानसभा सदस्य मा. राजू कागे,मा. सुनील गौडा पाटील,शिवसेना (ठाकरे गट)सडेतोड प्रवक्ते रणजित बागल,जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशजी जमदाडे,सुभाष पाटील,विवेक कोकरे व सर्व महाविकासाआघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच त्यांनी यावेळेस महाविकास आघाडीचा वचननामा देखील वाचून दाखवला महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रु. पर्यंत भत्ता आणि ५ वर्षात १२.५ लाख रोजगार निर्माण करणार,शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत कर्जमाफी देण्यासाठी आणि हमीभाव देण्यासाठी वचनबद्ध राहील.सर्व सामान्य कुटुंबासाठी २५ लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मिळणार व सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना करणार त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना समान हक्क मिळणार असल्याचे सांगितले.