विधानसभा निवडणुकीत जतमध्ये ११ तासगाव- कवठेमहांकाळमध्ये १७, मिरज, सांगली आणि खानापूर मतदारसंघासाठी १४ जण निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. जो उमेदवार जास्त परिचित आहे, अशा उमेदवारांकडे पदाधिकारी व कार्यकर्ते जास्त आहेत. इतरांकडे आपल्या एवढे पदाधिकारी व कार्यकर्ते नाहीत म्हणजे आपण निवडून येणार, असा विश्वास एका उमेदवारास आहे.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बळावर एक उमेदवार दोन, तीन गावे रोज फिरत आहे. पण निवडणूक होईपर्यंत कितीजण त्या उमेदवाराला साथ देणार हे आज तरी सांगणे कठीणच आहे. त्यात एक जरी कार्यकर्ता नाराज झाला तर त्या उमेदवाराच्या विजयाचे गणित चुकणार. त्यामुळे तो उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवत आहे. जेवण, नाष्टा, चहा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला जात आहे. असे असले तरी निवडणुकीत कोण कोणाचे गणित बिघडविणार हे मतदानानंतर कळणार, अशी चर्चा जिल्ह्याच्या चौका-चौकात रंगली आहे.
जाहीर केली होती. त्या भूमिकेशी आता सांगली विधानसभेच्या भूमिकेची तुलना केली जात आहे. काँग्रेसला सांगली विधानसभेची जागा मिळून अधिकृत उमेदवारी काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्याला दिली असताना विशाल पाटील बंडखोरीला रसद का पुरवित आहेत, असा सवाल पृथ्वीराज पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत वादाचे ग्रहण सुटण्यास तयार नाही. माझी लढाई काँग्रेसच्या अस्तित्वासाठी आहे, व्यक्तिगत नाही. पक्ष टिकला पाहिजे यासाठी लढाई असल्याची त्यांनी व्यक्त केलेली मते त्यांच्यासमोर मांडून विधानसभेतील भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.