येळवीत लांडग्याच्या हल्ल्यात शेळ्या ठार

0



संख : येळवी (ता. जत) येथे महादेव प्रल्हाद आवटे यांच्या शेळ्यांच्या कळपावर लांडग्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या जागीच ठार झाल्या.यामध्ये 25 हजार रुपयांचे नुकसान झाले. वनविभाग व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ही घटना बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. येळवीत आवटी वस्तीवर महादेव आवटे राहतात. घरासमोर शेळ्यांचा कळप बांधलेला होता.बाजूच्या शेतातून दोन लांडग्यांनी शेळ्यांवर अचानक हल्ला चढवला.दोन शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत.आवटे यांनी लांडग्यांना हुसकावले.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.