शेवटचा मतदार संघ,१० हजाराचे लीड, पडळकरांचा खलाटीतून ‌दौरा सुरू

0
376

जत तालुक्यातील गावभेट दौऱ्यादरम्यान खलाटी येथे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.सोबत आकाराम मासाळ,दिग्विजय चव्हाण,अभिजित चव्हाण, बाळासाहेब चव्हाण,सरपंच लताताई देवकते,प्रतिभा बनसोडे,शहाजी जाधव,ज्ञानेश्वर देवकते,साहेबराव शेजूळ,गणपती नडहट्टे,सुरज कोळी,बाजीराव शेजूळ,पोपट कोळी,तसेच सर्व मान्यवर,पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

दोन दिवसापुर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी बनाळी येथे माझ्या दौऱ्यातील शेवटचा डफळापूर मतदार संघ राहिला आहे.तेथे आपल्याला १० हजाराचे लीड मिळणार असल्याचा दावा केला होता.त्यापार्श्वभूमीवर सकाळपासून ते डफळापूर मतदार संघातील ग्रामस्थांशी संपर्क करत आहे.खलाटी येथून त्यांनी सुरूवात केली आहे.

तेथे मोठा जनसमुदाय उपस्थित होता.या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, नेते,यांनी पांठिबा दिला आहे.त्यांना पहिल्याच गावापासून मिळालेला प्रतिसाद त्यांचा दावा खरा ठरवणार का ? हे २३ तारखेला समजणार आहे.

जतचा-विकासपुत्र #गोपीचंदपडळकर

जतविधानसभा

GopichandPadalkar

Jath #Maharashtra

भाजपा #महायुती

BJPMaharashtra

Jath

AssemblyElection2024

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here