उमेदवारांच्या पायाला भिंगरी,प्रचाराला उरले अवघे इतके दिवस 

0
56

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेऊन चिन्ह वाटप झाल्यानंतर सर्वच उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचारातील सुरुवातीचे पाच दिवस बघता बघता गेले. आता केवळ नऊ दिवस प्रचारासाठी शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात उमेदवार आणि कार्यकत्यांनी पायाला भिंगरी लावून जोरदार प्रचार सुरू केल्याचे चित्र जत परिसरात दिसून येते. महाविकास आघाडीचे काँग्रेस

पक्षाचे उमेदवार आमदार विक्रम सावंत यांनी पहिल्याच दिवशी खासदार प्रणिती शिंदे व आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत प्रचारास प्रारंभ केला. दुसऱ्या दिवशी भाजपाचे उमेदवार, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचाराचा प्रारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. त्यामुळे जत तालुक्यात प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. अपक्ष उमेदवार तम्मनगौडा रवी पाटील यांनीदेखील जोरदार प्रचार सुरू केला आहे.

प्रचाराचे पहिले पाच दिवस कसे सरले हे धामधुमीत समजले नाही.निवडणूक प्रचार १८ तारखेला सायंकाळी संपणार आहे. उर्वरित दिवसांचे नियोजन करून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच उमेदवार आणि कार्यकर्ते यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वाधिक जास्त मतदार असलेल्या जत शहरामध्ये रॅली व कोपरा सभांवर भर दिला जाणार आहे. सध्यातरी जत तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रचारात एकमेकांवर आरोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. टीका-टिप्पणीवर भर वाढला आहे.

जत मतदारसंघ विस्ताराने मोठा

जत विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांना दररोज कित्येक किलोमीटरपर्यंत गाड्यातून प्रवास करावा लागतो. कमी काळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार, कार्यकर्त्यांना कसरत करावी लागत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here