कोरोना लढ्यातील वैद्यकीय सेवा देणारे योध्दा कुटुंब | डॉ.सी.बी.पवार,डॉ.कोमल, डॉ.शितल,डॉ.वैभव

0
3



जत,संकेत टाइम्स : कोरोनाच्या जीवघेण्यात काळात काही कुंटुंबे आपल्या क्षेत्रात स्व:ला झोकून सर्वोच्च योगदान देऊन देश सेवा करण्यात कार्यरत आहेत.त्यांच्या अशा कार्यांमुळे देश कोरोना विरोधातील लढाई प्रभावीपणे लढत आहे.






असेच जत तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या कतृत्वाने नावलौकिक मिळवत आहे.जत शहरातील अनेक वर्षापासून विष प्राशन केलेले,साप चावलेल्या हाजारो रुग्णांना वरदान ठरलेले कोल्हापूरचे माजी शल्य चिकित्सक डॉ.सी.बी.पवार यांचे कुंटुब होत.गेल्या 30 वर्षापासून डॉ.पवार जत तालुक्यासह परिसरातील रुग्णांना वैद्यकीय सेवा अल्प दरात पुरवत आहेत.त्यांनी शासकीय रुग्णालय,पवार हॉस्पिटलच्या माध्यमातून हाजारो रुग्णांना जीवदान दिले आहे.पहिल्या व दुसऱ्या प्रभावी कोरोना लाटेतही डॉ.पवार यांचे हे कार्य कायम सुरू आहे.






इतकेच नव्हे तर त्यांची तिन्ही अपत्ये डॉ.कोमल पवार,डॉ.शितल पवार,व डॉ.वैभव पवार हेही कोरोनाच्या लाटेत जीव धोक्यात घालत कोरोना बाधित रुग्णांना वाचविण्यासाठी राज्याच्या विविध भागात कार्यरत आहेत.

वडीलाचे अनुभव व बाळकडू मिळालेले डॉ.सी.बी.पवार यांच्या तिन्ही आपत्यांनीही तालुक्याची मान उंचावेल असे काम सुरू ठेवले आहे.त्यांच्या या कार्याचा येथे अभिमानाने उल्लेख करण्याजोगा आहे.






डॉ.कोमल पवार ; (एमबीबीएस एमडी,मेडिसिन डीएनबी ह्रदयरोग तज्ञ)सध्या मुंबईतील विख्यात एशियन हॉर्ट इन्स्टीट्यूट मध्ये ह्रदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी गेल्या 9 महिन्याहून जास्त काळासाठी बीकेसी येथील जगातील सर्वात मोठ्या कोविड सेंटर मध्ये

हृदय रोग विशेषज्ञ म्हणून सेवा पुरवली आहे.त्यांनी 1000 हून अधिक कोविड- 19 पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार करत त्यांना जीवदान दिले आहे.त्यामध्ये मुख्यत: आयसीयू मधील ऑक्सीजन सर्पोट आणि व्हेटिंलेटर वरील रुग्ण व ह्रदय संबंधित कोविडच्या क्रिटिकल असलेल्या रुग्णावर आपल्या अनुभवाच्या बळावर प्रभावी उपचार करून त्यांना मुत्यूच्या दारातून बाहेर काढले आहे.





डॉ.शितल पवार ;(एमबीबीएस एमडी  भूलरोग तज्ञ,डीएनबी क्रिटिकल केअर सुपरस्पेशालिटी) सध्या पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये इंटेन्सिव्हीष्ट म्हणून कार्यरत आहेत.

इथे त्या अतिदक्षता विभागातील कोविड रुग्ण जे ऑक्सीजन आणि व्हेटिंलेटर सर्पोट वर आहेत.त्यांच्यावर आहोरात्र उपचार करत आहेत.या आधी,अगदी कोविड-19 महामारीच्या सुरूवाती पासून जेव्हा या साथीबाबत मर्यादित माहिती आणि उपचार उपलब्ध होते.तेव्हापासून त्या कोविड रुग्णावर धोका पत्करून उपचार करत आहेत.






डॉ.वैभव पवार ; (एमबीबीएस एमडी,मेडिसिन जीएमसी लातूर)

कोविड योध्दा म्हणून लातूर येथे कार्यरत आहेत. मागील वर्षी त्यांना कोविड-19 ची बाधा झाली होती.त्यातून त्यांनी योग्य उपचार घेऊन बरे झाल्यानंतर पुन्हा कोविड रुग्णसेवा अविरत चालू ठेवली आहे. कोविड रुग्णांना सेवा पुरवताना स्वत:च्या कुटुंबापासून आलिप्त रहावे लागत आहे.डॉ.सी.बी.पवार व पवार हॉस्पिटलच्या संचालिका सौ.अनिता पवार यांच्या शिकवणीतून घडलेली तिन्ही मुले आज जगावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटात ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’हे ब्रीदवाक्य घेऊन अविरत रुग्णसेवा पुरवत आहेत.



वैद्यकीय सेवेतील डॉ.सी.बी.पवार यांची मुले डॉ.कोमल पवार,डॉ.शितल पवार,डॉ.वैभव पवार व त्यांच्या पत्नी अनिता पवार व नातू अव्यूक्त

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here