सुधाकर खाडे खून; तिघे अटकेत चार दिवस कोठडी : पोलिसांकडून कुऱ्हाड हस्तगत

0
378

मिरज: मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष व भाजप स्टार्ट अप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांचा शेतजमिनीच्या वादातून कुन्हाडीने वार करून खून केल्याप्रकरणी तिघांना अटक केली. न्यायालयाने तिघांनाही चार दिवस पोलिस कोठडी दिली आहे.खुनानंतर शेतात लपवून ठेवलेली कुन्हाड पोलिसांनी हस्तगत केली.सुधाकर खाडे यांनी मिरजेत चंदनवाले मळा येथील पावणेचार एकरजमीन विकसनासाठी घेतली होती.

मात्र जमिनीच्या कब्जेदारांनी यास हरकत घेतल्याने वाद सुरू होता. शनिवारी खाडे साथीदारांसोबत या जागेवर कुंपण घालण्यासाठी गेल्यानंतर कब्जेधारक लक्ष्मण चंदनवाले मुलगा युवराज चंदनवाले याने खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून त्यांचा खून केला. खाडे यांच्यासोबत आलेल्या प्रशांत जैनावतवर लक्ष्मण चंदनवाले याने कुदळीने वार केला.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here