सामाजिक तेड निर्माण करणाऱ्या कमेंट्स निंदनीय

0
28

– महादेव हिंगमिरे | आ.पडळकर यांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादमुळे षडयंत्र असल्याचा दावा

जत : उमदी(ता.जत) येथील महायुतीच्या जाहीर सभा दरम्यान एका चॅनेलवरील लाईव्ह प्रसारित केलेल्या लाईव्ह प्रतिक्रियामध्ये संस्कार टेंगले या तथाकथित समाजकंटकाने,मताच्या ध्रुवीकरणाकर्ता जाणीवपूर्वक लिंगायत समाजाच्या भावना दुखवणारे प्रतिक्रिया नोंदवली आहे. याबद्दल मी लिंगायत समाज व भाजपाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो.सदरची प्रतिक्रिया स्क्रीनशॉट काढून एका मिनिटाच्या आत सोशल मीडियावर व्हायरल केल्या.जाणीवपूर्वक रचलेलं षडयंत्र आहे.

त्याच अकाउंट वरून आमचे दैवत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही टीकाटीपणी केलेली आहेत. या पाठी मागला खरा मूळ चेहरा शोधण्यासाठी दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये संबंधित व्यक्तीवर तक्रार दिली आहे व गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर या समाज कंटकावर कारवाई करावी, असे प्रतिपादन महायुतीचे प्रचारक तथा लिंगायत समाजाचे नेते महादेव हिंगमिरे यांनी केले आहे.

यावेळी डॉ.रवींद्र आरळी,ज्येष्ठ नेते चंद्रशेखर गोब्बी,माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब नामद ,माजी पंचायत सदस्य रामाण्णा जीवनावर,लक्ष्मण जखगोंड,संजय तेली, डॉ.सार्थक हिट्टी, रमेश बिराजदार,राजू कमतगी,अनिल पाटील,बसर्गीचे सरपंच शिवाप्पा तवाशी,सोन्याळचे सरपंच बसवराज तेली , उमराणीचे सरपंच विजय नामद,उमदीचे सरपंच मुत्तू तेली,वाळेखिंडीच्या सरपंच वसुंधाताई  हिंगमिरे, बिळूरच्या सरपंच विद्याताई जखगोंड,नवाळवाडीचे अमोल शेटे,माडग्याळचे लिंबाजी माळी,रमेश उर्फ चिक्कु माळी,शिवसेनेचे नेते प्रवीण आवरादी,राम नाईक,शिवानंद लकडे,  बसवराज जखगोंड,धानाप्पा पट्टनशेट्टी,सोसायटीचे चिदानंद चौगुले,बसू धोडमाळ,प्रशांत माळी,गिरीश पट्टनशेट्टी यांच्यासह सर्वच समाज बांधवांनी  आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 हिंगमिरे म्हणाले,आपण सर्वजण पाहतच आहोत की, महायुतीचे उमेदवार जत तालुक्याचे विकास पुत्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मिळालेला उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद हा सर्वश्रुत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तालुक्यातून फेक इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून गाड्या कुठून आल्या किती आल्या? कसे आल्या याबाबत तर्कवितर्क करताना अत्यंत खालच्या आणि हीन वेळ पातळीवर जाऊन गाड्यांचे नंबर प्लेट फोटो काढून एका इंस्टाग्राम च्या चैनल वरून व्हायरल करण्यात येत होते.

काही जुन्या तत्कालीन परिस्थितीनुसार केलेले व्हिडिओ देखील जातीय निर्माण करावी या हेतून पोस्ट केल्या जात आहे. विरोधकांना विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवता येत नाही. हे या अंती स्पष्ट झालेले आहे. प्रत्येक गावागावात वाड्या वस्तीवर लहान मुलांच्या मूक नामात देखील आता गोपीचंदाचाच गजर आहे.त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे.खरं असतं पाहता संस्कार टकले या व्यक्तीचा आमच्या पक्षाशी कोणताही काडी मात्राचा संबंध नाही कोण व्यक्ती आहे हेही माहित नाही.

विरोधक धार्जिन जाणीवपूर्वक तयार केलेले फेक अकाउंट आहे.अद्याप याबाबत पुष्टी मिळाली नाही परंतु नक्कीच हे विरोधकांनी केलेलं षडयंत्र व कुभाड आहे. मताच्या ध्रुवीकरणाकर्ता रचलेला डाव आहे. जत तालुक्यातील मतदार अश्या षडयंत्राला कोणतेही प्रकारे बळी पडणार नाही आमदार गोपीचंद पडळकर हे सर्व जाती-जमातीचे नेतृत्व करणारे विकासपुत्र आहेत. भूमिपुत्राचा मुद्दा न चालल्याने हा केलेला उद्योग आहे जत तालुक्याचा माझा लिंगायत समाज व तमाम मतदार बंधू-भगिनी सुज्ञ आहेत येणाऱ्या काळात अशा करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या जागा निश्चितपणे दाखवतील .

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here