जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे कायदेविषयक शिबीर

0
78

सांगली : राष्ट्रीय शिक्षण दिन या विषयी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्यावतीने अकुज इंग्लिश मीडियम स्कूल कुपवाड येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीर घेण्यात आले.
      

या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी Victims of Trafficking and Commercial Sexual exploitation कायद्यांबद्दल माहिती सांगितली. तसेच मुलींना विशाखा समिती, गुड टच बॅड टच बद्दल माहिती दिली. शाळेत, बाहेर समाजामध्ये कोणी शारीरिक अथवा मानसिक त्रास देत असेल तर त्याला आळा घालण्यासाठी त्याची तक्रार शिक्षक अथवा आई वडिलांना सांगावे, असे मार्गदर्शन केले.
      

या प्रसंगी अॅड. अमोल डोंबे यांनी राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कौशल्य विकसित करण्याबद्दल, १८ वर्षाखालील मुलांना गाडी चालवू नये, याबाबत मार्गदर्शन केले. लायसन्स नसताना गाडी चालविली तर त्याचे दुष्परिणाम याबाबतची माहिती दिली. 
      

प्रास्ताविक विजय कोगनोळे यांनी केले. आभार श्रीमती ज्योती पाटील यांनी मानले. शिबिरास प्राध्यापक, कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्यने उपस्थित होत्या.  

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here