इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथील यंत्रमाग कारखान्यात वीजजोडणी करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या दोघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
लाइनमन रज्जाक हुसेन तांबोळी (वय ५०, रा. भारतनगर मिरज) व कर्मचारी आकाश शंकर किटे (३३. रा. धुळेश्वरनगर कबनूर) अशी दोघांची नावे आहेत. हे दोघेजण चंदूर येथील महावितरणच्या कार्यालयात कार्यरत होते.
मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई केली. तांबोळी याच्याकडून यापूर्वीही पैशांची मागणी करून ग्राहकांची अडवणूक केल्याचे प्रकार घडल्याची चर्चा सुरू होत्या.