अखेरच्या टप्प्यात फायर बॅण्ड नेत्यांचीच फक्त हवा

0
181

विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचे अवघे दोनच दिवस उरल्याने राज्यभरातील बड्या नेत्यांनी जिल्ह्यात सभांचा धडाका लावला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंतचे नेते जिल्ह्यात हजेरी लावत आहेत.

तासगावमध्ये शुक्रवारी महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पाटील यांच्यासाठी पवार यांची सभा झाली. गडकरी यांनी गुरुवारी पलूसमध्ये महायुतीचे संग्राम देशमुख यांचा प्रचार केला, तर पुन्हा शनिवारी ते मिरजेत सुरेश खाडे यांच्या प्रचारासाठी येणार आहेत.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी बेडग (ता. मिरज) येथे सभा घेतली. मिरज मतदारसंघातील या गावात वंजारी समाज मोठ्या संख्येने असल्याने त्यांचे १०० टक्के मतदान उमेदवार सुरेश खाडे यांच्याकडे वळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

जतमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही शुक्रवारी महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांच्यासाठी सभा घेतली. आटपाडीमध्ये महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली.प्रचार कालावधीतील शेवटचे काही दिवस निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरतात. त्यामुळे आपल्यासाठी मोठ्या नेत्याने सभा घ्यावी, हा प्रत्येक उमेदवाराचा प्रयत्न असतो. काटालढती असलेल्या तासगाव कवठेमहांकाळ, शिराळा, इस्लामपूर, खानापूर, जत, सांगली, पलूस कडेगाव मतदारसंघांत प्रचारकांची गर्दी दिसत आहे.

फायर बॅण्ड नेत्यांनी हवा तापवली

काही मतदारसंघांत सुरुवातीच्या टप्प्यात लढतींमध्ये चुरस दिसत नव्हती. मात्र, दुसऱ्या आठवड्यात हवा तापत गेल्याने प्रचाराचा धडाका उडाला आहे. राज्यभरातील फायर बॅण्ड नेत्यांमुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय संघर्ष भलताच तापला आहे.

कलाकारांची हवा कमी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी

सिने कलाकारांना आणण्याचा फंडा प्रत्येक निवडणुकीत वापरला जातो. पण, यंदाच्या यवडणुकीत त्यांची हवा तशी फारशी दिसत नाही. कलाकारांना आणून गर्दी खेचण्याऐवजी आपल्या पक्षाच्या स्टार नेत्यांना आणण्याकडे उमेदवारांचा कल राहिला आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here